Page 1
लेखकाचे मनोगत
॥ लेखकांचं मनोगत ॥
जय जगदंब!
श्रीहरीच्या चरणी नतमस्तक होऊन, मनातील भक्तिभाव शब्दरूपाने व्यक्त करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे.
वारकरी संप्रदाय ही महाराष्ट्राच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक जीवनाची अनमोल परंपरा आहे. संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज, संत तुकाराम महाराज यांसारख्या संतश्रेष्ठांनी आपल्या अभंगवाणीच्या माध्यमातून समाजाला भक्ती, प्रेम, समता, सदाचार आणि मानवतेचा मार्ग दाखविला. त्यांच्या वाङ्मयातून नामस्मरणाचे सामर्थ्य आणि भगवंताशी एकरूप होण्याचा आनंद अनुभवायला मिळतो.
‘नारायण हरिपाठ’ हा केवळ भक्तिपर लेखनाचा विषय नसून, तो मनाला शांती देणारा, विचारांना दिशा देणारा आणि जीवनाला भक्तिमय बनविणारा एक आध्यात्मिक प्रवास आहे. संसारातील सुख-दुःख, आशा-निराशा आणि धावपळीच्या जीवनात भगवंताचे नामस्मरण माणसाला अंतःकरणातील स्थैर्य आणि सकारात्मकतेची जाणीव करून देते.
या लेखनातून हरिनामाचे महत्त्व, संतविचारांची प्रेरणा, सद्गुरूंच्या कृपेचे मोल, कृतज्ञतेची भावना आणि परमेश्वराच्या चरणी शरण जाण्याचा आनंद वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे.
माझ्या लेखनातील प्रत्येक शब्द वाचकांच्या मनात भक्तीचा दिप प्रज्वलित करो, प्रत्येक विचार सदाचाराची प्रेरणा देवो आणि प्रत्येकाच्या जीवनात श्रीहरीच्या नामाचा गोडवा निर्माण होवो, हिच श्रीनारायणाच्या चरणी प्रार्थना!
या लेखनप्रवासात प्रेरणा देणाऱ्या संतपरंपरेला, सद्गुरूंना आणि माझ्या लेखनावर प्रेम करणाऱ्या सर्व वाचकांना मी कृतज्ञतापूर्वक वंदन करतो.
आपल्या सर्वांच्या जीवनात भक्ती, समाधान, प्रेम आणि सद्भावना नांदो, हिच सदिच्छा.
॥ श्री नारायण हरी चरणी अर्पण ॥
आपला स्नेहांकित..
(ऋषीदास)
श्री मनोज जोशी बालमटाकळीकर